पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वतीने भालेश्वर येथील इसमाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथील चक्रधर सहारे वय 41 वर्ष हे भुमीहीन आहेत. ते सध्या पोटाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.

सदरची बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांना माहीती होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर व्यक्तिच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली.

सदर आर्थिक मदत देतांना जि.प.सदस्या सौ.स्मिताताई पारधी, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, चिमुर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष काशीनाथ खरकाटे गुरूजी, जि.प.सदस्य डाॅ.राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, अॅड.गोविंदराव भेंडारकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, नगरसेवक महेश भर्रे, किसान काॅंग्रेस सेलचे नानाजी तुपट, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रमोद मोटघरे, माजी सभापती नेताजी मेश्राम, चौगानचे सरपंच उमेश धोटे, माजी नगरसेवक संजय ठाकुर, माजी सरपंच राजेश पारधी, वकार खान, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, माजी सरपंच संदीप सेलोकर यांसह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleदेशाला पुन्हा उभे करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554