भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षा तर्फे नगरपरिषदला घेऊन केवळ जुमलेबाजी

0
467
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आरोप

घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगीक शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या घुग्घुम ग्रामपंचायतला नगरपरिषदेत रूपांतर करावे म्हणून मागील 27 वर्षापासून विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आंदोलन करीत होते . युतीचे प्रथम शासन महाराष्ट्रात आले असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी यांनी तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष व नागरिकांच्या उपस्थित घुग्घुस नगरपरिषद झाल्याचे जाहीर केले. व संपूर्ण घुग्घुस परिसरात नगरपरिषदचे शिल्पकार म्हणून बॅनर ही लावले गेली पांच वर्ष राज्यात भाजपचीच सत्ता होती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे जिल्हापरिषदचे अध्यक्ष होते त्यावेळेस जिल्हापरिषद मध्ये घुग्घुस नगरपरिषदचा प्रस्ताव दोन मिनिटात रद्द करण्यात आले.

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे शासन येताच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरपरिषद साठी अनुकूलता दाखविली व पालकमंत्री यांनी घुग्घुस नगरपरिषदला हिरवी झेंडी दाखविली व लगेच प्रथम अधिसूचना ही शासकीय स्तरावर जाहीर झाली.

यावेळेस भाजप नेते व महिला सभापती याच्यापतीने घुग्घुस नगरपरिषद होऊ नये म्हणून खोटी हरकत दाखल करवून घेतली. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे घुग्घुस ग्रामपंचायतची निवडणूक लागली ही निवडणूक होऊ नये म्हणून आम्ही मुंबईला गेलो व त्याठिकाणी पालकमंत्री विजय वड्डेटीवार साहेबां कडून घुग्घुस ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली असता पालकमंत्री साहेबांनी तात्काळ नगर विकास विकास विभागाला पत्र देऊन घुग्घुस ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली असता पालकमंत्र्याचे पत्राची दखल घेऊन राज्यातील दहा ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषद मध्ये होत असल्यामुळे तीन महिण्या करिता मदर निवडणूक कार्यक्रम र करावा असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले हे होत असतांना भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पदाधिकाऱ्यासह चंद्रपुर जिल्हाधिकारी यांना घुग्घुस नगरपरिषद करून निवडणूक घ्या असे निवेदनातून मागणी केली स्थगिती करीता नगर विकास विभागाचे पत्र समाज माध्यमावर झळकताच आपण जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रा मुळे सदर कारवाई झाल्याचे बालिशपणाचा कांगावा शुरू केला.

एकीकडे सत्तेत असतांना नगरपरिषदला विरोध करायचा दुसरीकडे आम्हीच केली असा हाव आणायचा हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण असून आम्ही याचा निषेध करतो असे आरोप पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी केला याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ पत्रकार व नेते शामराव बोबडे, युवक कांग्रेस अध्यक्ष तौफीक शेख, कल्याण सोदारी, अजय उपाध्याय उपस्थित होते.