मारडा (मोठा) येथे लसीकरणाचे 100 टक्के उदिष्ठ पूर्ण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांचे मार्गदर्शनात लसीकरण

चंद्रपूर : ग्राम पंचायत मारडा (मोठा) येथे आज मंगळवारी जिल्हा परिषद शाळेत कोविड-19 लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. एकूण 150 लसीची उद्दिष्टे  देण्यात आले होते, त्यानुसार 100 टक्के लसीकरणाची उद्दिष्टे पूर्ण झाले. या कार्यक्रमाला सरपंच गणपत चौधरी, उपसरपंच बालनाथ काळे,ग्रामपंचायत सदस्य सुभाष पिंपळशेंडे , ग्रामसेवक राजु पिदुरकर , व आरोग्य विभागाचे कर्मचारी  उपस्थितीत  होते.

गावातील एकूण 150 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी जि,.पं.सदस्य ब्रिजभुषण पाझारे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. लसीकरण कार्यक्रम यशस्वीतेकरीता अश्विनी कोडापे ( सी.एच.ओ.) , एस.डी.सहारे ( आरोग्य सेविका ) , श्री.प्रफुल पराते (आरोग्य सेवक ), सौ.ज्योती वाकुलकर (ANM ) सौ.प्रतिभा चौधरी , सौ छाया चौधरी (आशा वर्कर) , निकिता वाकुलकर ग्रामपंचायत सदस्या , राहुल ठावरी (संगणक परिचालक), भुवनेश्वर गोरे , मारोती राजुरकर यांनी सहकार्य केले.