चंद्रपुरात 16 मृत्यूसह 1425 बाधितांचा उच्चांकी आकडा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• चंद्रपूर मनपा क्षेत्र,वरोरा,ब्रम्हपुरी,भद्रावती येथे विक्रमी वाढ
• बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली
• ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,207

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 1425 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.तर 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज बाधितांचा उच्चांकी आकडा आलेला आहे. तसेच बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44 हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 24 झाली आहे. सध्या 12 हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 64 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 85 हजार 107 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 56 व 65वर्षीय महिला, 58 व 76 वर्षीय पुरुष,बाबुपेठ येथील 65 वर्षीय पुरुष, गजानन महाराज चौक परिसरातील 36 वर्षीय पुरुष, रहमत नगर येथील 62 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी,नगीना बाग परिसरातील 55 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 41 वर्षीय पुरुष, तर ब्रह्मपुरी येथील 50 वर्षीय पुरुष, सरदार पटेल वार्ड, वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, वणी-यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष, बामणी येथील 45 वर्षीय महिला, भिसी-चिमूर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 588, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1425 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 445, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 104, भद्रावती 102, ब्रम्हपुरी 133, नागभिड 42, सिंदेवाही 43, मूल 65, सावली 23, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 21, राजूरा 59, चिमूर 41, वरोरा 207, कोरपना 40, जिवती 16व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.