कोरपना उपकेंद्रात लसीकरण सुरू केल्याने पहिल्याच दिवशी ३५० लोकांचे लसीकरण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरपना उपकेंद्र स्तरावर लसीकरण सुरू केल्यामुळे नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंतर्गत येत असलेल्या बिबी व खिर्डी या दोन उपकेंद्रात आज लसीकरण घेण्यात आले. त्यामुळे आज नारंडा २००, बिबी १०० व खिर्डी ५० अशाप्रकारे एकूण ३५० लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील टेंभे यांनी दिली आहे.
बिबी व खिर्डी येथील उपकेंद्रात ४५ वर्षावरील लोकांसाठी लसीकरण सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकरिता सोयीचे झाले आहे. उपकेंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात यावे यासाठी बिबी येथील उपसरपंच आशिष देरकर यांनी आमदार सुभाष धोटे व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने एकट्या नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३५० लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले. एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३५९ लोकांचे लसीकरण हा आकडा फार मोठा असल्याचे मत आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी व्यक्त केले.

लोकांचे समाधान गावातल्या गावात लसीकरणाची सोय उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबी व खिर्डी उपकेंद्राअंतर्गत येत असलेल्या लोकांना नारंडा येथे १० किलोमीटर लसीकरणाकरिता जावे लागत होते. ही व्यवस्था गावातल्या गावात झाल्याने लोकांचा वेळ व खर्च वाचला.