चंद्रपूर दारू तस्करांवर कारवाई करण्यास नकार देणा-या पोलिस निरीक्षकाला निलंबित करा

0
475
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सर्वपक्षीय नेत्यांचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना निवेदन

• राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे 22 जानेवारीला करणार तक्रार

चंद्रपूर : दोन दिवसापूर्वी मंगळवारच्या रात्रीला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात येणारी कोट्यवधी रुपयांची दारू पकडून पडोली पोलिसांच्या स्वाधीन केली. त्याच रात्रीला दारू तस्करांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दूरध्वनी द्वारे विनंती केल्यानंतरही कारवाई करण्याचे सोडून उलट आमदार महोदयांना उर्मट उत्तर देणा-या पोलिस निरीक्षकांला तात्काळ निलंबीत करावे, अशी मागणी घेवून सर्व पक्षीय नेत्यांनी आज गुरूवारी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली.

या प्रकारामुळे पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे मध्ये चंद्रपूरात होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीबाबत चांगलेच घमासान सुरू झाले आहे.
मंगळवारी (19 जानेवारी) ला रात्री दहाच्या सुमारास नागपूर मार्गे चंद्रपूरात दारु तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळाली होती.  त्यांनी 15 वाहनांचा ताफा विविध मार्गावर तैणात करून स्वत: नागपूर मार्गावर ठाण मांडून होते. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील खांबाळा गावाजवळ संशयीत वाहनांना आ. जोरगेवार यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. वाहने न थांबता भरधाव वेगाने पळाली, तेव्हा आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहनांचा पाठलाग सुरु केला. पाठलाग सुरू असताना दारु तस्कारांनी आ. जोरगेवार यांच्या वाहनावर गाडी चढविण्याचाही प्रयत्न केला. हा प्रयत्न असफल झाल्याने तस्करांनी त्यांच्या जवळील दारुच्या बॉटला आ. जोरगेवार यांच्या वाहनावर फेकण्यास सुरूवात केली. परंतू आ. जोरगेवार यांनी पाठलाग सोडला नाही. अखेर अखेर ताडाळी ते पडोळी मार्गावर या दारु वाहनांना थांबविण्यात यश आले. येथे चार वाहने पकडली. त्यापुढे दोन वाहने पकडलीत.

तसेच दारूतस्करीच् वाहनांतील पायलट वाहनही पकडण्यात आले. असे एकूण पायलट वाहनांसहीत सात वाहने दारूच्या पेट्या भरलेले वाहने पकडीत. त्यांनतर आमदार जोरगेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांना दूरध्वनी द्वारे माहिती दिली. मात्र त्यांनी दारू पकडणेक आमचे काम नाही. पोलिस ठाण्याला माहिती द्या असे उर्मट उत्तर देवून कारवाई करण्यात टाळाटाळ केली. अखेर पोलिस अधिक्षकांच्या मध्यस्थीनंतर दारूने भरलेले वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

काही वर्षापूर्वीच चंद्रपूरात दारूबंदी करण्यात आलेली आहे.मात्र चोरमार्गाने दारूची आयात चंद्रपूरात होत आहे. शिवाय पोलिस प्रशासनाची मुकसंमती असल्याचे पोलिस अधिका-यांच्या वागण्यावरून दिसून येत आहे. जिल्हयाच्या लोकप्रतिनिधीला असभ्य व उर्मट उत्तर देणा-या या अधिका-यांच्या या वृत्तीमुळेच राजरोजपणे जिल्ह्यात चंद्रपूरात दारूविक्री होत आहे. त्यामुळे या पोलिस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी मनसे, आम आदमी पार्टी, यंग चांदा ब्रिगेड, आरपीआय यांनी पोलिस अधीक्षक साळवे यांची भेट घेवून केली आहे. 22 जानेवारीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपुरात येत असून आमदार जोरगेवार व महाविकास आघाडी मिळून त्यांचेकडे पोलीस निरीक्षक खाडे यांची तक्रार करणार आहे.