महाराष्ट्र : सर्वच सामाजिक कार्यक्रमांवर बंदी, लॉकडाऊन नको असल्यास नियम पाळण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहन

0
488
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यात त्यांनी राज्यातील जनतेला कोरोना प्रतिबंधक नियमावलींच्या पालनाचे आवाहन करतानाच लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे जनतेच्या हातात असल्याचे सूचक संकेत दिले.

लॉकडाऊनचा निर्णय जनतेच्या हातात

पुढचे आठ दिवस मी तुम्हाला देत आहे. तुम्ही कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करा. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे तुमच्या हातात आहे असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. लॉकडाऊनसंदर्भात येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

सभा, समारंभांवर बंदी

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता काही प्रतिबंधात्मक नियमांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम आता ऑनलाईन होतील असेही ते म्हणाले. तसेच राज्यात सर्वच राजकीय सामाजिक, धार्मिक अशा सार्वजनिक कार्यक्रमावर बंधने घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनांवरही यावेळी बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी सरकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

‘मी जबाबदार’ ही नवी मोहीम

कोरोनाशी लढण्यास मी जबाबदार अशी मोहीम राबवण्यात येईल असेही ते म्हणाले. जनतेने मास्क वापरावा. सॅनीटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे असे कळकळीचे आहवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वर्क फ्रॉम होमवर भर द्या

वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन वेळांचेही योग्य नियोजन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अधिकाधिक प्रमाणात वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन करतानाच जिथे कार्यालयात येण्याची गरज आहे तिथे कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या टीममध्ये विभागणी केली जावी. त्यांना 15 दिवसांच्या अंतराने कार्यालयात बोलाविले जावे. अशा प्रकारे नियोजन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.