• नगरसेविका निलम आक्केवार यांच्या कार्याचे कौतुक
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर महापालिका प्रशासन सज्ज आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास अशा परिस्थितीत रुग्णसेवा करण्यासाठी मदत व्हावी, म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर प्रभाग क्र. – १७ (क) च्या नगरसेविका निलम सचिन आक्केवार यांनी आपल्या तीन महिन्यांच्या मानधनाची रक्कम कोरोना रिलिफ फंडात जमा केली. सदर रक्कम मासिक मानधनातून कपात करण्यात यावी, असे पत्र नगरसेविका निलम सचिन आक्केवार यांनी महापौर राखी संजय कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांना दिले.
कोविड -१९ चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूर शहरात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोना सेंटरमधील लोकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या उपायायोजनेचा खर्च भागविण्याकरीता र३० हजार कोरोना रिलिफ फंड येथे देण्याची घोषणा डॉ. आंबेडकर प्रभाग क्र. – १७ (क) च्या नगरसेविका निलम सचिन आक्केवार यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या मानधनातून माहे एप्रिल २०२१ ते जुन २०२१ पर्यंतचे ३ महिन्यांचे मानधन कोरोना रिलिफ फंडात जमा केले. सामाजिक दायित्व म्हणून ३ महिन्याचे मानधन कपात करण्यात यावे, असे विनंती पत्र महापौर राखी संजय कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल कौतूक होत आहे.