चंद्रपूर : मूल तालुक्यातील दाबगाव शेतशिवारात विहिरीत पडलेल्या एका साडेचार महिन्याच्या वाघाच्या बछड्याला वाचविण्यात वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यश आले. आज बुधवारी 21 एप्रिल ला घ सकाळी रेस्क्यू करून त्याला बाहेर काढण्यात आले आहे.
मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहीरीत चार साडेचार महिन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला. हि माहिती त्वरीत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. मुल येथील संजीवन पर्यावरन संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे ,मनोज रणदिवे,पंकज उजवने,राहुल जिरकुंटवार,प्रशांत मुत्यारपवार,स्वप्निल आक्केवार,अंकुश वानी,प्रतीक लेनगुरे, संकल्प गणवीर,यश मोहुर्ले हे सुध्दा घटनास्थळी त्वरीत उपस्थीत झाले. अतीशीघ्र कृतीदल चंद्रपुर व अतीशीध्र कृतीदल ताडोबाचे राजु बडकेलवार ,अजय मराठे व टीम यांनी विभागीय वनअधिकारी सारीका जगताप मैडम यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू करून वाघाच्या बछड्याला सुखरुप विहीरीतुन बाहेर काढले. वाघाच्या बछड्याला चंद्रपुर येथील प्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले आहे. या सर्व कार्यवाही दरम्यान सहाय्यक वनसरंक्षक श्रीनीवास लखमावाड, आर.एफ.ओ. कारेकार, डॉ.पोडचलवार क्षेत्र सहाय्यक खनके,क्षेत्र सहाय्यक मेश्राम, वनरक्षक गुरनुले,मानकर,मरस्कोले,रोगे,मडावी मैडम व पोलीस उपस्थीत होते.