खासदार पती आणि आमदार पत्नीने केली आरोग्य यंत्रणेची पाहणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• वरोरा, भद्रावती येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करणार

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढत आहे. जिल्ह्यातील वरोरा- भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याकरिता ऑक्सीजन प्लॅन्ट उभारा, मुबलक औषध साठा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा तसेच प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण भागातील शाळा ताब्यात घ्या अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. त्यांनी आज वरोरा , भद्रावती येथील आरोग्य यंत्रणेच्या आढावा घेतला. यात कोरोनाला पासून प्रभावी लढा देण्याकरिता वैद्यकीय सुविधांच्या अभाव पडता कामा नये ज्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्या आमदार निधीतून त्वरित उपलब्ध करण्यात येणार आहे. जनतेने देखील कोविड बाबतची भीती काढण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

आज वरोरा येथील ट्राम कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद सदला व तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही तुमच्या नेहमी सोबत असल्याचे त्यांनी अस्वस्थ केले. त्यानंतर येथील वसतिगृह येथे वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यात काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, वरोरा विधानसभा अध्यक्ष शुभम चिमुरकर, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे यांची उपस्थिती होती. तसेच भद्रावती येथे जैन मंदिर येथील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, आरटीपीसीआर केंद्र येथे भेट दिली. त्यानंतर नगर परिषद भद्रावती येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी अत्यावश्यक आरोग्य सुविधा ज्यांच्या तुटवडा जाणवत आहे. त्यांच्या आढावा घेण्यात आला. त्या आमदार निधीच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शिंतोडे, वैद्यकीय अधिकारी मनीष सिंग, डॉ. नितीन सातभाई, पोलीस उपनिरीक्षक जगताप यांची उपस्थिती होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने शासनाचे वेळो वेळी सुचविण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गरज नसताना बाहेर पडू नये. व मास्क तसेच सामाजिक अंतर ठेवावे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेला केले.