घुग्घुस नप प्रशासनाची व्यापारी प्रतिष्ठानावर दंडात्मक कारवाही

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : कोविड 19 नियमांचे पालन न करणाऱ्या आठवडी बाजार, गांधी चौक ते मालगुजारी तलाव पर्यंत असणाऱ्या रस्त्यावरील निरंजन नगराळे जनरल स्टोर्स, निरंजन डंभारे जनरल स्टोर्स, पुजा मॅचिंग सेंटर, राधे राधे मेन्स, पायल ड्रेसेस, जोगी बुक डेपो,मनिषा ड्रेसेस कापड दुकान, चौधरी क्लाथ स्टोर्स, पटेल कॉम्पुटर आणि मोबाईल शॉप व राजधानी वस्त्र भंडार अशा एकूण अकरा विक्रेत्यांवर कारवाई करीत मंडल अधिकारी किशोर नवले व नगर परिषेदेचे कर्मचारी यांनी 11500 हजाराचा दंड ठोठावला आहे.

यात पूजा मॅचिंग सेंटर 2,000 हजार रुपये,राधे राधे मेन्स 2,000 हजार रुपये, पायल ड्रेसेस 1,000 रुपये जोगी बुक डेपो 1,000 रुपये, मनीषा ड्रेसेस 1,000 हजार रुपये, चौधरी क्लाथ स्टोर 1,000 हजार रुपये,पटेल कॉम्प्युटर 1,500 हजार रुपये, राजधानी वस्त्र भंडार 1,000 हजार रुपये असा दंड ठोठाविण्यात आला तसेच विना मास्क लावणाऱ्याना ही दंड ठोठाविण्यात आला आहे.

शहरात रोज पोलिसाचे वाहन फिरत असतात शासनाच्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तू सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश असताना हे व्यापारी दिवसभर विक्री करतात तर काही व्यापारी दुकाना समोर बसून राहतात ग्राहक आल्यावर दुकानाचे अर्ध्य शटर उघडून मालाची विक्री करतात यामुळे अशा दुकानदारावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे दिनांक 21मे ला नगर परिषेदेचे कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी यांनी बाजारपेठेची पाहणी सुरु केली असता काही विक्रेत्यावर कोविड 19 नियमांचे उल्लंघन करताना दिसताच नगर परिषेद प्रशासनाने दंड ठोठावला व दुकाने बंद ठेवण्याची ताकीद दिली.तरी कोरोना नियमाला न घाबरता सर्रास पणे विक्री करताना दिसून येत होते. ही कारवाई महसूल विभागाचे मंडल अधिकारी किशोर नवले व नगरपरिषेदेचे कर्मचारी यांनी केली.