औद्योगिक शहर घुग्घुसात अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट उभारा : देवराव भोंगळे यांची मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : देशभरात सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजनची मुबलकता ही किती महत्त्वाची आहे याची जाणिव आपल्याला आली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे नियोजन म्हणून घुग्घुस शहरात एक अत्याधुनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनातून केली आहे.

घुग्घुस शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास लगतचे पंधरा गावे जोडलेली आहे. तसेच जवळपासच्या अनेक ग्रामीण भागातील नागरिक घुग्घुस शहरात उपचारासाठी येतात. सध्या घुग्घुस परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे कोरोना बाधित रुग्णांची व कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने मोठया प्रमाणात रुग्ण दगावले होते. आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्याअनुषंगाने घुग्घुस शहरात एक ऑक्सिजन प्लांट उभारण्याची नित्तांत गरज आहे.

घुग्घुस शहरात ऑक्सिजन प्लांट उभारल्याने कोरोनाचा तिसरा लाटेचा सामना करताना घुग्घुस शहर वासियांची गैरसोय होणार नाही. तरी प्रशासनाने तात्काळ एक नवीन ऑक्सिजन प्लांट घुग्घुस शहरात उभारावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी निवेदनातून केली आहे.