लग्नासाठी आता संख्येचीच नव्हे तर वेळेचीही मर्यादा, नियम मोडल्यास 50 हजारांचा दंड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
“लग्नासाठीही आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.”

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. इतकच नाही तर लग्नासाठीही आता संख्येचीच नाही तर वेळेचीही मर्यादा घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास थोडाथोडका नाही तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. (Attendance of only 25 people and 2 hour limit for wedding ceremony)

2 तासांत लग्न उरका!

यापूर्वी लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100 वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचटा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.