अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मागील वर्षापासून कोरोना चा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर असल्यामुळे विविध उद्योगधंद्यांची आर्थिक स्थिती खालावल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. यातच प्रतिबंध कालावधी शितील झाल्यामुळे विविध उद्योगधंदे पुनश्च सुरू झाले अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध च्या तथा मागण्या त्यांना घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कामगार सुनील ढवळस यांच्या नेतृत्वात विजय क्रांती कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली या कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या मागण्यांना घेऊन विविध आंदोलन करण्यात आली.

मात्र कंपनी व्यवस्थापना पुढे यापूर्वी अस्तित्वात एल अँड टी कामगार संघापुढे कंपनी व्यवस्थापनाला विविध कारणांना घेऊन हतबल लागले सर्व कामगारांच्या समस्या जैसे थे राहिल्या आज स्थितीला संपूर्ण राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे कंत्राटी कामगारांना केवळ महिन्या अंती दहा ते बारा दिवस कामावर बोलावले जाऊ लागले त्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती अधिक बिकट झाली मागील वर्षी कंपनी व्यवस्थापनाने कोणी बंद असताना सुद्धा प्रत्येकाला पंधरा ते अठरा दिवसाचा पगार देऊ केला. मात्र आज घडीला उद्योगधंदा सुरू असताना सुद्धा कामगारांच्या हाताला काम नाही परिवार देशोधडीला लागला मुलाबाळांचा प्रश्न कामगारा पुढे उभा राहिला कुटुंब चालवायचं कसं हा प्रश्न कामगारांना सतत व्हायला लागला.

त्यामुळे वाट चुकलेल्या कंत्राटी कामगारांनी पुनश्च विजय क्रांती कामगार संघटनेच्या खांद्याला खांदा लावून संघटनेच्या नेतृत्वात सकाळपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काम बंद बैठे सत्याग्रह सुरू केला शेवटी कंपनी प्रशासनाने पोलीस प्रशासनाला तात्काळ आमंत्रित करून मध्यस्ती करण्याकरिता आग्रह केला गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती पोलीस उपनिरीक्षक शिंदे, रायपुरे चौकी अमलदार नागोबा बुराण तिरुपती माने सुनील मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून ज्या कामगारांना केवळ पाच ते सहा दिवस रोजगार मिळाला अशा सर्वांना पंधरा दिवसाचा रोजगार मिळावा यासाठी कंपनी व्यवस्थापनाला अस्वस्थ केले यातच दुसरा मुद्दा असा की सदर उद्योगधंद्यामध्ये जास्तीत जास्त कामगार हा मराठी व परिसरातील असल्यामुळे शिवाय प्रत्येकाकडे काही ना काही प्रमाणात शेती व्यवसाय असल्यामुळे चा हंगाम नुकताच सुरू झाल्यामुळे एक दोन दिवस रजा घेतलेल्या कामगाराला पुराना तपासणीची सक्ती केली जाते व अभिप्राय येथपर्यंत त्याला कामावर रुजू केल्या जात नाही यामुळे सुद्धा अनेक कामगारांचे रोजगार बुडत आहे हा कामगार आवर्ती होणारा अन्याय आहे याशिवाय मागील महिन्यामध्ये गैरहजर असलेल्या कामगारांचा पगार हा अर्जित रजे मधून वजा करण्यात आल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाची तीव्र लाट निर्माण झाली असून बैठ्या सत्ता ग्रहा सारखे अवजार कामगारांना हातात घ्यावे लागते.

उद्योग धंदा सुरू असताना सुद्धा केवळ कामगाराचे व त्याच्या परिवाराचे पोट भरावी ही एवढी रास्त मागणी घेऊन कामगारांनी बैठा सत्याग्रह सुरू केला मात्र पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने कामगारांची समस्या निकाली निघाली यातच सकाळी सात वाजता पासून तर बारा वाजेपर्यंत कंपनी व्यवस्थापनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची टाळता येत नाही कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार 27 तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास व पाच ते सहा दिवस रोजगार मिळालेल्या कामगारांना पंधरा दिवसाचा रोजगार न मिळाल्यास विजय क्रांती कामगार संघटना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे तीव्र हत्यार अनुप असल्याशिवाय राहणार नाही असा तीव्र इशारा विजय क्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील ढवस यांनी दिला आहे.