चंद्रपूर : वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी १८ जून २०२१ ला यासंदर्भात आदेश जारी केले.
वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांना प्रमोशन देऊन चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारी पदी होते. त्यानंतर गडचरोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र, नगर विकास विभागाचा दिनांक ११ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेश परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यानचे बदल्याचे विनियमन आणि नगर परिषद मुख्याधिकारी गट अ संवर्ग तील सदर्भाधीन आदेशानुसार शासनाच्या आदेशानव्ये अंशतः बदल करून वर्धा येथील विद्यमान मुख्याधिकारी असलेले श्री. जगताप यांच्या ठिकाणी गडचिरोली येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विपीन मुद्दा यांची बदली करण्यात येत आहे.
मागील १० महिन्यांपूर्वी विपीन मुद्दा यांनी वर्धाचा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात वर्धा शहरात अनेक विकासात्मक कामे झाली. ज्यात वर्धा नगर परिषदेची प्रशस्त इमारत निर्माण, जनतेच्या सहकार्यातून स्वच्छ व सूंदर वर्धा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले. तत्पूर्वी बल्लारपूर नगर परिषदेत जनतेच्या सहकार्यातून अनेक उपक्रम राबविली होती. स्वच्छ बल्लारपूर, सुंदर बल्लारपूर संकल्पना राबवून राज्यस्तरावर पारितोषिकही त्यांच्या काळात बल्लारपूर नगर परिषदेला मिळाले होते.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्या तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्या बल्लारपूर शहराला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने थ्री स्टार दर्जा (कचरा मुक्त शहर) देण्यात आला. केंद्रीय गृह आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी आज व्टीटर द्वारे ही माहिती जाहीर केली.