कंत्राटी कामगारांचे प्रेत पोहचले अल्ट्राटेक प्रशासकीय भवनात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ मागण्या मान्य होईपर्यंत मृत शरीर उचलणार नाही
◆ सिलारकर कुटुंब कामगारांचा आक्रोश

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात आवारपूर या परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये बीएफ कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिकल्स या कंत्राटी ठेकेदाराकडे आवारपूर निवासी ईश्वर संभाजी शिलारकर (वय 49 ) हे दिनांक 10 जून रोजी कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व्यवस्थापनाच्या अधिनस्त असलेल्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचाराकरिता जखमीला चंद्रपूर येथील मेहरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे पाठवण्यात आले.

परंतु ढासळत असलेली प्रकृती लक्षात घेता डॉक्टर मेहरा यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला तब्बल अकरा दिवसानंतर उपचार घेत असताना दिनांक 21 जून रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली कर्तव्यावर असताना अपघात झाल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या पूर्वी घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत या ठिकाणी कार्यरत असलेल्या एल अँड टी कामगार संघटना व विजय क्रांती कामगार संघटना या दोन्ही संघटनेच्या वतीने मृतकाला योग्य तो मोबदला व त्याच्या वारसाला नोकरी मिळावी या मागण्यांना घेऊन चर्चेला सुरुवात झाली.

मात्र चर्चा असफल ठरल्याने शेवटी कुटुंबियांनी ईश्वर शीलारकरांचे मृत देह कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणून ठेवले. वारंवार चर्चा करूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने शेवटी कंपनी प्रशासनाच्या प्रशासकीय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मृत देह आणून ठेवण्यात आले जोपर्यंत कुटुंबाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून कोणत्याही प्रकारे मृत देह हलवण्यात येणार नाही अशा प्रकारचा पवित्रा घेण्यात आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या सुचनेनुसार ठाणेदार गोपाल भारती, निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वात घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक दाखल करण्यात आले व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शेवटी कंपनी व्यवस्थापन हे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सकाळी साडेदहा वाजता पासून वृत्त लिहीपर्यंत मृत ईश्वर शिलारकर यांचे पार्थिव कंपनी व्यवस्थापनाच्या प्रशासकीय भवनाच्या प्रवेश द्वाराजवळ ठेवण्यात आल्याचे दिसले.