ACC सिमेंटनगर येथील SBI ATM फोडण्याच्या प्रयत्न; एका आरोपीस अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : सहा दिवस पूर्वी ACC सिमेंटनगर येथील SBI बँकेचा ATM फोडण्याचा एका अज्ञात चोरट्याने प्रयत्न केला. १७ ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी राजू श्रावण बुरडे बँकेचे सर्व्हिस प्रबंधक यांना दरवाजा उघडा दिसला आत प्रवेश करून बघितले असता लॉकचा हुक वाकलेला व कॅश डिस्पेंसर वाकलेला दिसला व CCTV कॅमेरा तपासला असता एक युवक लाल रंगाचा शर्ट घातलेला तसेच काळ्या रंगाचा दुपट्टा बांधून एटीएमच्या आत येताना दिसला व त्याने सिसिटीव्ही कॅमेरावर दुपट्टा टाकतांना दिसला. त्यातील रोख रक्कम तपासली असता बरोबर दिसली.

त्यांनी घुग्घुस पोलिसात तक्रार दिली तक्रारी वरून दिनांक १९ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 379,511 गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे पथकाने सिसिटीव्ही कॅमेरा चेक करून लालरंगाच्या कपड्यावरून व हातात घातलेल्या तीन कड्यावरून आरोपी मुनीराज परमेश मंचीनिल्ला (२३) रा. नकोडा यास दिनांक २१ ऑगस्ट रोजी नकोडा येथून ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने यास अटक करण्यात आली.

ही कारवाई पो. नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, महेश मांढरे, महेंद्र वन्नकवार, सचिन डोहे, रवी वाभिटकर यांनी केली.