पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपुरी शहरातील अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी : केंद्रातील भाजपा सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईने आता सर्वसामान्यांसह युवकही वैतागले असुन युवकांचा काँग्रेस पक्षाकडे कल वाढलेला दिसत आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रम्हपुरी शहरातील अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस पक्षात युवकांची फार मोठी फळी तयार होत असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
ब्रम्हपुरी येथील गोसेखुर्द विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, नगरपरीषदेचे गटनेता विलास विखार, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्य स्मिताताई पारधी, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा योगीताताई आमले, बंटी श्रीवास्तव, पं.स.माजी सभापती नेताजी मेश्राम, सोमेश्वर उपासे, मुन्ना रामटेके यांसह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार म्हणाले कि, काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करू इच्छिणाऱ्या व पक्षप्रवेश केलेल्या सर्व युवकांचे स्वागत असुन काँग्रेस पक्ष हा युवकांना भरारी देण्याचे काम करीत असतो. सोबतच युवकांनी सुध्दा आता सक्रियपणे राजकारणात येऊन नेतृत्व करीत समाजाची सेवा केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदर पक्षप्रवेश हा किसान काँग्रेस सेलचे नानाजी तुपट, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी अमित कन्नाके यांच्या नेतृत्वाखाली अभय बनपुरकर, चैतन्य मेकर्तीवार, निखीलेश नंदूरकर, अमोल शेंडे, अभय दोनाडकर, अजिंक्य बरडे, प्रतीक नरड, दर्शन कलंत्री, आकाश डांगे, सुरज भोयर, तनूज हुकरे, वैष्णव मेश्राम, प्रणव मेश्राम, प्राश खोब्रागडे, अनिकेत डांगे, अमन निमजे, वैभव निशाने, दिनेश तलमले, पवन वाघमारे, आकाश डांगे, आशुतोष देशमुख, अनिल करंडे, सौरभ डांगे, आशिष मुंडे, श्रेयस जांभूळे, अविष्कार आत्राम, स्वप्नील कोळकर यांसह अन्य युवकांनी पक्षप्रवेश केला आहे.