चंद्रपूर : 20 फेब्रुवारीला सरकार नगर ला राहणाऱ्या एका अविवाहित युवतीने भाजप नगरसेवक संदीप आवारी यांच्यावर गंभीर आरोप केले.
युवतीच्या आरोपाने राजकीय क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली, त्या युवतीने संदीप आवारी वर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला.
सरकार नगर ला त्या युवतीच्या घराच्या जागेवरील वाद मागील काही महिन्यापासून सुरू आहे, वानखेडे दाम्पत्य ती जागा आमचीच म्हणत असून याबाबत युवती व वानखेडे यांचा नेहमी वाद सुरू असतो, 15 फेब्रुवारीला असाच वाद झाला असता दुपारच्या सुमारास ती युवती नगरसेवक संदीप आवारी यांच्या घरी पोहचली व सदरच्या वादात सहकार्य करण्याची विनंती केली मात्र आवारी यांनी तो वाद तुमचा परस्पर असून आपसात निपटवा असा सल्ला दिला, मात्र त्या युवतीने मदत केली नाही म्हणून गंभीर आरोप केले.
मागील अनेक वर्षांपासून मी विवेकनगर प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहो, माझी राजकीय प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे, या षडयंत्रामागे माजी नगरसेवकांचा मुलगा आहे असा थेट आरोप आवारी यांनी यावेळी केला. त्या मुलीने गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2014 मध्ये एका युवकांवर अत्याचाराचे आरोप केले होते मात्र तो युवक त्या आरोपातून निर्दोष सुटला, आता पुन्हा अश्या पद्धतीचे चुकीचे आरोप माझ्यावर केल्या गेले आहे, त्या युवतीच्या आरोपात तथ्य नाही, याबाबत मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
त्या युवतीने केलेले आरोप जर खरे असतील तर माझी व त्या युवतीची नार्को टेस्ट करायला हवी नार्को टेस्ट साठी मी तयार आहो असे थेट आवाहन संदीप आवारी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.
यावेळी माजी महापौर व नगरसेवक अंजली घोटेकर, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, व नगरसेवक संजय कंचरलावार उपस्थित होते.