वेकोलिच्या राजीव रतन हॉस्पिटल मध्ये माजी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी घेतली लस

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोरोना रुग्णांसाठी १०० बेड उपलब्ध करून केल्याबद्दल मानले आभार

चंद्रपूर : आज वेकोलि वणी क्षेत्राच्या घुघुस येथील राजीव रतन हॉस्पिटल मध्ये पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दुसरी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.

वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देशक श्री मनोज कुमार यांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी चर्चेअंती दिलेल्या शब्दाप्रमाणे वेकोलिने जिल्ह्यात कोरोना संक्रमितांसाठी आपले जिल्ह्यातील चंद्रपूर क्षेतत्रीय हॉस्पिटल, वणी क्षेत्राचे राजीव रतन सेंट्रलहॉस्पिटल, माजरी क्षेत्रीय हॉस्पिटल व बल्लारपूर क्षेत्रीय हॉस्पिटल अशे चारही हॉस्पिटल उपलब्ध करून फार चांगले काम केले आहे यामुळे अहिर यांनी विशेषकरून वेकोलिच्या हॉस्पिटल मध्ये लस घेण्याचा कार्यक्रम आखला व तेथील वणी क्षेत्राचे महाप्रबंधक श्री कावळे साहेब, मेडिकल ऑफिसर डॉ आनंद कुमार , सब एरिया श्री सुजितकुमार पिसारुडी, डॉ सांबारकार, श्री एस जी वैरागडे, डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टॉप यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन आभार मानले. कोरोना संक्रमितांसाठी जिल्ह्यात ऑसीजन व्यवस्थेसोबत १०० बेड पेक्षा अधिक बेड उपलब्ध करून वेकोलि कोरोना रुग्णांसाठी मदतीला उतरली आहे. याबद्दल वेकोलिचे सीएमडी श्री मनोज कुमार यांचेही फोन करून आभार मानले.

तसेच वेकोलि मार्फत आपल्या मायनिंग क्षेत्रातील जवळपासच्या गावात आयसोलेशन केंद्र उभे करण्यात आले आहे आणि आतासुद्धा करीत आहे. पुन्हा आता लवकरच वेकोलीमार्फत जिल्ह्यात ऑक्सिजन लिक्विड प्लांट उभारण्यात येणार आहे.
यावेळी सोबत ज्येष्ठ बंधू हरिश्चंद्र अहिर, श्री विजय राऊत , श्री मधुसूदन रुंगटा, मीनाताई देशकर यांनी सुद्धा लस घेतली. यावेळी वणी क्षेत्राचे महाप्रबंधक श्री कावळे यांनी सुद्धा लस घेतली. हंसराज अहिर यांनी वेकोलिच्या हॉस्पिटल मध्ये लस घेतल्याबद्दल जीएम आणि डॉक्टरांनी अहिर यांचे आभार मानले. यावेळी श्री संजय तिवारी यांची उपस्थिती होती.