नंदोरी गिट्टी खदान येथे ब्लास्टिंग दरम्यान एका मजुराचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : वरोरा येथून जवळच लागून असलेल्या नंदोरी परिसरात अनेक खोल गिट्टी खदान आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
नंदोरी येथील चौपनरीट मधील गिट्टी खदानीत सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग साठी खड्डे करण्यात आले. वर्धा येथील मडावी नामक व्यक्तीकडून स्पोटके घेऊन वरोरा येथील स्फूर्ती होल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाठवण्यात आले. हा सगळा व्यवहार लक्ष्मी नंदन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकाच्या सांगण्यावरून झाला. या घटनेत दरम्यान ओम प्रकाश शर्मा याचे ब्लास्टिंग मधील खड्डे पहात असताना खड्यात घसरून मृत्यु झाल्याचे कंपनीतील सुपरवायझरने सांगितले.

यानंतर प्रकरणाची सावरासावर करत कंपनीतील काही लोकांनी मृतदेह सेवाग्राम येथ स्वगृही पाटवण्यात आले असे कळविले. कोणतीही पोलीस चौकशी न करता मृतदेह सरळ त्याच्या घरी पाटवण्यात आल्याने शंकेची सुई लक्ष्मी नंदन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड व श्रुती हॉल कन्स्ट्रक्शन कंपनी वर जाते असल्याचे बोलल्या जात आहे दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन येथे माहिती सादर करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

कंपनीतील सुपरवायझरने मृतकाच्या परिवारास समजावून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही नुकसान भरपाई अजून पर्यंत या परिवारास मिळालेले नाही. यापूर्वी सुद्धा असेच प्रकार या गिट्टी खदान परिसरात घडले असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.