अंधश्रद्धेतून सामूहिक मारहाणीतील आरोपींवर कठोर कारवाई करा : खा. बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी (बूज.) गावात अंधश्रद्धेतून वयोवृद्धांना जबर मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेचा खा. बाळू धानोरकर यांनी तीव्र निषेध केला असून मारहाणीतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना केली आहे.

शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे पीडित जखमींची विचारपूस व धीर देऊन त्यांनी अंधश्रद्धेवर प्रखर टिका केली. यावेळी चंद्रपूर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर यांना जखमी झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.

वणी बूज येथिल महिला व वयोवृद्ध व्यक्तींना गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून भरचौकात हातपाय बांधून आरोपींनी सामूहिक मारहाण केली. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आरोपोनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला प्रोत्साहन व बळी न पडण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले असून आरोपींना कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे.

शासकीय रुग्णालय चंद्रपूर भेटीत खासदार बाळू धानोरकर यांचे समवेत चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव नम्रता आचार्य, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, सुनील पाटील, अशोक मत्ते, प्रशांत भारती, कुणाल चाहारे,   मतीन कुरेशी, अनु दहेगावकर, शालिनी भगत,  स्वाती त्रिवेदी, सुनीता धोटे, हर्षा चांदेकर, सुनील पाटील, संदीप सीडाम यांची उपस्थिती होती.