चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या भोंगळ कारभाराविरूध्‍द आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

८ दिवसात मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास तिव्र आंदोलन – विशाल निंबाळकर

चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाद्वारा संचालित जिल्‍हा रूग्‍णालयात १७ वर्षीय युवती कु. सानिका अनमुलवार, रा. तोहोगांव ता. गोंडपिपरी हिचा उपचाराअभावी मृत्‍यु झाला. ही अतिशय दुर्देवी व वेदनादायक बाब आहे. रूग्‍णालयात वैद्यकिय अधिकारी व डॉक्‍टर्स ची कमी आहे. त्‍यामुळे रूग्‍णांवर उपचारांना अतिशय वेळ लागत आहे. याचाच परिणाम म्‍हणून कु. सानिकाचा मृत्‍यु झाला.

या व इतर अनेक असुविधांचा निषेध करण्‍यासाठी लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज प्रशासनाविरूध्‍द ‘होश में आओ’ आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, महानगर महिला अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महासचिव प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, शिला चव्‍हाण, धनराज कोवे, राजेश थुल, भाजयुमो मंडळ अध्‍यक्ष गणेश रामगुंडावार, संजय पटले, गजू भोयर, महामंत्री किशोर भोपये प्रामुख्‍याने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विशाल निंबाळकर म्‍हणाले, मागील काही दिवसांपासून शासकीय रूग्‍णालयाचा कारभार अतिशय ढिसाळ व अव्‍यवस्‍थीत झाला आहे. डॉक्‍टरांची कमी, रक्‍ताची कमी, वेगवेगळया टेस्‍टींग न होणे या व अनेक असुविधा रूग्‍णालयात झाल्‍या आहेत. खरेतर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येवून 5 वर्षे पूर्ण झाली असून चंद्रपूरच नव्‍हे तर पुर्व विदर्भातून इथे येणा-या रूग्‍णांची संख्‍या वाढली आहे. अशा वेळेला असलेल्‍या सुविधा रूग्‍णांना न मिळणे व नविन सुविधा न वाढविणे याचा मी तिव्र निषेध करतो. पुढील आठ दिवसात रूग्णालयाची स्थिती सामान्‍य न झाल्‍यास तिव्र आंदोलन उभारण्‍याचा मी याप्रसंगी सरकारला ईशारा देतो. यानंतर भाजयुमोच्‍या एका शिष्‍टमंडळाने चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी यांना मागण्‍यांचे निवेदन सादर केले.

याप्रसंगी देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे यांचेही यथोचित मार्गदर्शन झाले. हे आंदोलन यशस्‍वी करण्‍यासाठी उपाध्‍यक्ष यश बांगडे, साजित कुरेशी, स्‍नेहीत लांजेवार, कुणाल गुंडावार, राहूल पाल, राजेश यादव, श्रीकांत येलपुलवार, सागर हांडे, आकाश मस्‍के, पवन ढवळे, अक्षय शेंडे, रामनारायण रविदास, अभी वांढरे, सचिव सतिश तायडे, आकाश ढुसे, प्रविण उरकुडे, मयुर चहारे, प्रणय डंबारे, मनिष पिपरे, सत्‍यम गाणार, बंडू गौरकर, शुभम सुलभेवार, योगेश चौधरी, देवेंद्र बेले, वासुदेव बेले, सागर भगत, उमाशंकर पांडे, नितीन कारीया, उमेश यादव, राजू भगत, रघु गुंडला, अमित पुलीपका, साईकुमार कासर्ला, श्रीनिवास जूनमुलवार, सचिन गौरकार, दीपक हूड, विपीन निंबाळकर, विपीन कारमोरे, राकेश टेंभुरकर, प्रशांत चहारे, यश पंदीलवार, सुमीत देहारकर, नितीन मुंढरे यांची उपस्थित होती.