चिमूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटरला १० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची मदत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी स्व:खर्चातून केली मदत
• गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर त्यात जिल्हा प्रशासन यांचेकडे मागणी करूनही विलंब आणि त्यातही कमी पुरवठा होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेताच चिमूर भागातील रुग्णांसोबत आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण होत आहेत. त्‍यावर उपायोजना म्हणुन चिमूर येथील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र कुठेही न पाठवता इथेच उपचार घेता यावा व रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांचे कडून स्व:खर्चाने उपाययोजना करण्यात येत आहे. चिमूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटरला १० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आले आहे.

चिमूर येथून प्रत्येक जिल्ह्य मुख्यालय व जिल्हा आरोग्य यंत्रणांचे अंतर १०० की.मी च्या अधिक असून रुग्णांची प्रकृती चिंताजनक होताच किंवा वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण होताच रुग्णांना बाहेर ठिकाणी हलविल्याशिवाय पर्याय नसतो. आधीच सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि उपलब्ध झालेला ऑक्सिजन साठा पुर्ण वेळ पुरत नसल्याने अतिगंभीर समस्या निर्माण होऊन रुग्णांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो.. हे लक्षात घेता आधीच पूर्वतयारी ठेवून तातडीने १० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वखर्चातून करून दिली असून, चिमुर तालुक्यातील रुग्णांना इतरत्र कुठेही न जाता इथेच उपचार घेता येईल. नागरिकांनी सुद्धा कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उपविभागीय अधिकारी चिमूर संकपाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांना हे सर्व जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द करण्यात आले. त्यासोबत नागभिड येथेही लवकरच पोहोचतील असे नियोजन केले आहे.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते राजुभाऊ देवतळे, एकनाथजी थुटे, युवा नेते भाजपा चिमूर समीरभाऊ राचलवार, टीमुजी बलदुवा, विक्कीभाऊ कोरेकार आदी उपस्थित होते.