कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• घुग्घूस येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथील कार्यरत शिक्षक महेंद्र (गुलाब) पाल सामाजिक उपक्रम

चंद्रपूर : कोरोना संसर्ग जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील रुग्ण दवाखान्यात भरती होत असून टाळेबंदी मुळे त्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला भोजन मिळत नाही यामुळे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून गजानन महाराजांच्या आशीर्वादाने घुग्घूस येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथील कार्यरत शिक्षक महेंद्र (गुलाब) पाल यांनी यांनी रुग्ण व त्यांचे सोबत असणाऱ्या व्यक्तीला मोफत अन्नदान करण्याचा वाटप 20 एप्रिल 2021 पासून सुरु केला आहे.

आता पर्यंत बऱ्याच गरजू रुग्णांना अन्नदान (भोजनदान )वाटप केलेला आहे, चंद्रपूर येथील कोणत्याही दवाखान्यात रुग्ण भरती असेल किंवा टाळेबंदी असल्यामुळे कोणाला भोजनाचा डब्बा मिळत नसेल अशा रुग्णांना व रुग्णासोबत असणाऱ्या व्यक्तीला दोन्ही वेळचा भोजन डब्बा मोफत दवाखान्यात पोहचता करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांनी किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींनी शिक्षक महेंद्र पाल हे चंद्रपूर येथे राहत असून त्यांचा भ्रमंनध्वनी क्रमांक 9822528099 या नंबरवर संपर्क साधावा किंवा व्हॉट्साप द्वारे कळवावे, असे शिक्षक महेंद्र पाल,
आवाहन केले आहे.