लोढ़ा मल्टीस्पेशालिटी आणि सुगम हॉस्पिटल ला नियमित ६० ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा होणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• खासदार बाळू धानोरकरांच्या पुढाकारातून कोलमडलेल्या ऑक्सीजनला मिळाला स्वास

चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू देखील होत आहे. गंभीर बाब म्हणजे उपचार न मिळाल्याने व वेळेवर हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन उपलब्ध नसल्यामुळे देखील अनेक लोकांचे प्राण गेले आहे. वणी येथील देखील ह्या दोन हॉस्पिटलमध्ये काही एक दिवसा पुरतेच ऑक्सीजन शिल्लक होते. हि बाब खासदार बाळू धानोरकर याना माहित होताच त्यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सांगून हा प्रश्न मार्गी लावून दिला.

आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत नारखेडकर, उपविभागीय अधिकारी घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, डॉ. लोढा, डॉ, लिमजे, डॉ, जुमनाके, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, बसंत सिग यांची उपस्थतीती होती.
खासदार बाळू धानोरकर हे नेहमी संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करीत असतात. जनतेला कुटुंबातील सदस्या प्रमाणे सुख दुःखाच्या वेळी नेहमी धावून जातात. आज देखील वणी येथील दोन कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा संपत असल्याचे त्यांना समजताच त्यांनी वणी येथील डॉक्टरांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी हा गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याचे सांगितले. त्यांनी देखील साकारत्मक निर्णय घेत ६० ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करून देण्याचे सांगितले. त्यामुळे संवेदनशील खासदार बाळू धानोरकर यांच्या पुढाकारातून वणी येथील दोन हॉस्पिटलला दिलासा मिळाला आहे. येथील रुग्णावर देखील योग्य उपचार होणे सोईचे होणार आहे.