‘मोदी लाईव्ह येऊन रडणार’; ‘या’ खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, पाहा व्हिडीओ

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाने काहींची कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. तर काहींच्या जवळच्यांना कोरोनाने आपलं शिकार केलं. जवळचा माणूस गेल्यावर काय दु:ख होतं प्रत्येकाला माहित आहे. अशाच प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झालेले पाहायला मिळाले होते. मात्र यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांनी केलेला भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

आम आदमी पक्षाने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचं म्हटलं आहे. संजय यांनी 17 एप्रिलला याबाबत भाकित केलं होतं आणि ते भाकित 21 मेला खरं ठरलं असल्याचं पत्रकात सांगितलं आहे.

अजून थोडे दिवस वाट पाहा मोदी तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील, असं 17 एप्रिलला संजय यांनी एक मुलाखत दिली होती त्यामध्ये ते म्हणाले होते.

दरम्यान, या मुलाखतीचा काही भाग संजय यांनी आपल्या ट्विट केला आहे. 17 एप्रिलला बोललो ते 21 मे रोजी खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवी आहे. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहे, असं संजय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.