‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,’ आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी

कर्नाटकातील बंगळुरु येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सध्या देशात कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात लोक आपला जीव गमवत आहेत. अशातच इतर कारणांमुळे देखील अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र बंगळुरु येथून समोर आलेल्या घटनेत संबंधित मुलीची परिस्थिती पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

संबंधित घटना ही बंगळुरु मधील राजाराजेश्वरी येथील आहे. राजाराजेश्वरी नगरात एका 47 वर्षाची अविवाहीत महिला तिच्या आई आणि भावासोबत राहत हेती. संबंधित महिलेला मानसिक आजार देखील आहे. संबंधित महिलेचा भाऊ आणि तिची आई 2 दिवसांपुर्वी मृत झाले होते. दोन दिवसांनंतर मृतदेहांचा वास येण्यास सुरूवात झाली. तेव्हा शेजारील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

संबंधित महिलेचं नाव श्रीलक्ष्मी असं आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना महिलेच्या भावाचा मृतदेह खिडकीजवळ अढळला. घराची पाहणी केल्यानंतर दुसऱ्या खेलीत महिलेच्या आईचा देखील मृतदेह सापडला. श्रीलक्ष्मी यांच्या आईचं नाव आयार्बा असं असून तिच्या भावाचं नाव हरिश असं आहे.

दरम्यान, आपल्या आई आणि भावाचा मृत्यू झाल्याचं श्रीलक्ष्मीला तिच्या मानसिक आजारामुळे समजलंच नाही. यावेळी पोलिसांनी तु काही खाल्लं की नाही?, असा सवाल श्रीलक्ष्मी यांना केला. यावर उत्तर देताना माझी आईच जेवण बनवते, मग मी जेवते, मात्र 2 दिवस झाले ती झोपलीये, म्हणून मी जेवलेच नाही, असं श्रीलक्ष्मी यांनी सांगितलं. श्रीलक्ष्मी यांचं उत्तर ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा आला.