अंबुजा च्या पॅकिंग प्लांट कामगारांना दिड लाखाची मेडीक्लेम पॉलिसी मिळणार; नरेश पुगलिया यांचा पुढाकार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट वर्क्स च्या पॅकिंग प्लांट कामगारांना दिड लाखाची मेडीक्लेम पॉलिसी मिळणार असल्याची माहिती मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे महासचिव अजय मानवटकर यांनी दिली.

घोषणा होताच कामगारांनी मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांचे आभार मानले आहे.

सिमेंट कंपनी च्या पॅकिंग प्लांट मध्ये काम करणाऱ्या पॅकिंग ऑपरेटर व लोडर यांना सिमेंट धुळीचा नाहक त्रास सहन लागते कंपनी मार्फत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करीत असतात तरीही धुळीचा सामना करावा लागत असल्याने त्यांना आपल्या आरोग्याचा सामना करावा लागत असल्याने आरोग्यावर मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागायचा त्यामुळे आरोग्यावर अधिक खर्च होवु नये या करीता मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अंबुजा सिमेंट लिमिटेड यांच्याशी मागणी केली अंबुजा सिमेंट लिमिटेड च्या वरिष्ठांनी ही मागणी मान्य करीत अंबुजा सिमेंट उद्योगातील पॅकिंग प्लांट च्या पॅकर आॅपरेटर व लोडर यांना 1,50,000 रु(दिड लाख रुपयाचे) मेडीक्लेम पॉलिसी मिळणार आहे.

याचा फायदा उद्योगातील पॅकिंग प्लांट च्या 288 कामगारांना मिळणार असुन त्याची अमलबजावणी एक आॅक्टोंबर 2021 पासुन लागु होणार आहे. अशी माहिती मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाही चे महासचिव अजय मानवटकर यांनी दिली. यात सागर बल्की,इक्बाल शेख, धर्मराज पारदे, संतोष झाडे, आणि इतर सदस्य व कामगारांनी माजी खासदार नरेश पुगलिया यांचे आभार मानले.