चंद्रपूर ग्रामीण जिल्‍हाध्यक्षपदी सायली देठे तर शहर जिल्‍हाध्यक्षपदी प्रमित माहुरकर यांची नियुक्ती

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विजया कदम यांच्या सूचनेनुसार, राज्य समन्‍वयक सम्राट साळवी, विदर्भ समन्वय गणेश लिमजे यांच्‍या मार्गदर्शनात सांस्‍कृतिक विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्‍हाध्यक्षपदी सायली देठे तर शहर जिल्‍हाध्यक्षपदी प्रमित माहुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्‍या हस्ते पत्र देऊन ही नियुक्ती करण्यात आली.

यावेळी शहर जिल्‍हाध्यक्ष रितेश तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस जिल्‍हाध्यक्ष चित्रा डांगे यांची उपस्थिती होती.

त्यांच्या नियुक्तीबद्दल अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, कुणाल गाडगे, आशिक निमगडे, कपिल मंचालवार व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.