घुग्घुस नगरपरिषद प्रकरण | समाज कल्याणाऐवजी कुटुंब कल्याणासाठी खटाटोप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस ( चंद्रपूर ) : राजकारण हे जनविकासाचे माध्यम व्हावे, अशी अपेक्षा सामान्य जनतेला असते. मात्र, सत्तेच्या खुर्चीवर बसून चिकटलेल्यांना हेच राजकारण स्व विकासाचे साधन ठरू लागले आहे. म्हणूनच की काय घुग्घुस नगर परिषदेच्या स्थापनेला विरोध करीत आपल्या पत्नीची जागा राखण्यासाठी पतीदेव समाजकल्याण साधण्याऐवजी कुटुंब कल्याण साधण्यात भूषणात मानत आहेत.

वर्ष 1998 महाराष्ट्रात युतीचे पहिले सरकार होते. चंद्रपूर विधानसभेचे तत्कालीन आमदार घुग्घुस विकासा करिता नगरपरिषद महत्वाचे असल्याचे सांगून नगरपरिषद करिता संघर्ष करीत होते.
तत्कालीन मुख्यमंत्री यांनी घुग्घुस येथील सभेत आजपासून घुग्घुस नगरपरिषद झाल्याचे जाहीर सभेत हातात कागद भिरकावीत जाहीर केले.
तत्कालीन आमदार नगरपरिषदचे शिल्पकार ही झाले. मात्र नगरपरिषद झाली नाही. त्यानंतर त्यांचा विधानसभेचा क्षेत्र बदलला
आणि त्यासोबत नगरपरिषदचा विचार ही बदलला उदघोषणा झाल्यानंतर ही नगरपरिषद थंड बसत्यात गेली.
त्यानंतर विविध संघटना, राजकिय पक्ष सातत्याने नगरपरिषद साठी संघर्ष करीत राहिले वीरूगिरी पासून ते धरणे, भीक मांगो,जेल भरो अशी शेकडो आंदोलने केलीत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी घुग्घुस येथील युवा नेता विराजमान झाल्यानंतर नगरपरिषदला घेऊन नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र जिल्हा परिषदने चक्क घुग्घुस नगरपरिषद विरोधात ठराव घेतल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. हा स्वतःचे पद प्रतिष्ठा वाचविण्यासाठी केलेली खटाटोप होय.
प्रदिर्घ कालावधी नंतर महाविकास आघाडी शासनाने व जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी नगरपरिषदला हिरवा कंदील दाखविला. नवीन उदघोषणा ही झाली. आता नगरपरिषद झाली तर गावाचा विकास होईल . मात्र आपल्या पत्नीचा सभापतीपद जाईल व पद गेल्याने आपला विकास थांबून जाईल ही चिंता राजकीय सत्ता पदस्थ पतीदेवला सतावू लागली आहे.
मग त्याने नगरपरिषदला आक्षेप घेण्यासाठी लोकांची जमवा – जमव सुरू केली. आणि जमलेल्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी आक्षेप ही नोंदविला. मात्र या सहापैकी एकाला आपण गावाविकासा विरोधात केलेल्या कृत्यांचा पश्चाताप झाला. त्याने क्षमापत्र लिहून जिल्हाधिकारी यांच्या समक्ष माफी मागितली. त्यामुळे घुग्घुस नगरपरिषद रोखण्यासाठी सभापतींचे पती असले उचापती करीत असल्याचे उघङकीस आले व गाव विकासापेक्षा स्वतःचा विकास जास्त महत्त्वाचे असते व खायचे दात वेगळे आणि दाखवायचं वेगळे असते यांची ही परत एकदा प्रचिती आली.