नागपुरात माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• सांस्कृतिक कार्य व पर्यावरणमंत्री पदही भूषवले होते

• देवतळे यांचे निधनाने सर्वत्र शोककळा

चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजयबाबू देवतळे, यांचे आज नागपूर येथे उपचारा दरम्यान कोरोनाने निधन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वरोरा हा हक्काचा मतदारसंघ. त्यांचे पुत्र डॉ. विजय देवतळे शिक्षणासाठी परदेशी राहत असल्याने त्यांच्या निधनानंतर दादासाहेबांचे पुतणे संजय देवतळे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आले. वरोरा मतदारसंघावर हक्क प्रस्थापित केला. संजय देवतळे यांचा वरोरा हा गड राहिला. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात दबदबा कायम ठेवला होता. या मतदारसंघाच्या माध्यमातून आमदार आणि मंत्रिपदही मिळविले.

काँग्रेसने विधानसभेसाठी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य व पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. निवडणूक लढली. पण, घरातच लढा द्यावा लागल्याने त्यांचा पराभव झाला.
भद्रावती येथील ग्रामउद्योग कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले होते. त्या कार्यक्रमानंतर उमरेड मार्ग ते बेला येथे जात असताना संजय देवतळे यांच्याकडे चहापानासाठी आले. यावेळी त्यांनी संजय देवतळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली व भाजपमध्ये यावे व आपण जोमाने काम करावे, अशी सूचना केली. त्यानंतर लगेच भाजपामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.
यावेळी भाजपा नेते बाबासाहेब भागडे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरोडा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीमध्ये भाजपला जागा निश्चित मिळेल अशी शक्यता असताना ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार संजय देवतळे यांना धनुष्यबाण हातात घेऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.आज नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे कोरोनाने निधन झाले.