बागबगिच्यांवर कोट्यवधींचा खर्च ? तर दवाखानने अपूर्णच 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : संपूर्ण जिल्ह्यात औद्योगिक शहर म्हणून प्रसिध्द घुग्घुस शहर एसीसी सिमेंट, लोयड्स मेंटल्स कंपनी, कोळश्याच्या खाणीने नटलेला विकासाच्या नावावर गेल्या पांच वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी बगीचे बांधण्यात आले. एक सुसज्ज स्तिथीतील बस स्थानक तोडून नवीन बस स्थानक बांधन्यात आले. मात्र 2014 साली मंजूर झालेला 30 खाटांचा दवाखान्याकडे गेली पांच वर्ष सरळ – सरळ दुर्लक्ष करण्यात आले. आज या महामारीत त्यांची किंमत शहरातील नागरिकांना मोजावी लागत आहे.
कोरोनाच्या या संकटात वेकोलीने 28 खाटांचा ऑक्सीजन युक्त रुग्णालय उभारला आणि त्यांची सेवा फक्त आपल्या कर्मचाऱ्यां पूर्तीच मर्यादित ठेवली. आणि शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ 6 जनरल बेड आहे. आणि कोविड आजाराच्या उपचारासाठी नागरिकांना चंद्रपूर येथे शासकीय खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. संसर्ग इतक्या त्रिवतेने वाढत आहे की 12 लोकांना ज्यात तरुणानं पासून वयोवृद्ध शामिल आहे त्यांना जीव गमवावा लागला तर दुसरीकडे जवळपास 520 कोरोना बाधीतांची संख्या झालेली आहे.
शहरात जिल्ह्यात वजन ठेवणारे नेते आहेत त्यांनी केवळ सिमेंट रस्ते, बगीचे, बस स्टँड, यांच्यावरच विशेष लक्ष दिले आज रस्ते विरान झाले असून बगिच्यात टाळे लागले आहेत.
आज नागरिक स्वकीयांच्या उपचारासाठी टाहो फोडत आहे मात्र या शहरात एक ही व्हेंटिलेटर नाही ही शोकांतिका आहे. आता काही राजकिय नेते पुढे येऊन व्हेंटिलेटर युक्त कोविड सेन्टरची मागणी करीत आहे. अजून ही वेळ गेली नाही या औद्योगिक शहराला जो आता नगरपरिषद ही झाला आहे याला तातळीने व्हेंटिलेटर युक्त रुग्णालय प्रशासनाने निर्माण करून द्यावा हीच समस्त घुग्घुसवासीयांची माफक अपेक्षा आहे.