संजयबाबूंच्या निधनाने वरोरा- भद्रावती मतदार संघाची हानी : खासदार बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. संजयबाबू देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

संजयबाबू देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याच मतदार संघात सेवा करण्याची संधी मलाही आमदारकीच्या रूपात मिळाली. आज त्याच्या विकासाचा रथ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्याच विरोधात विधानसभा लढली. मी तेव्हा हरलो. मात्र, संजयबाबू जिंकल्याचा तितकाच आनंद होता. कारण ते मंत्री होऊ शकले आणि वरोरा- भद्रावती मतदार संघाचे नावलौकिक केले. हा मनातील आनंद मी त्यांना भ्रमणध्वनीवर विजयी शुभेच्छा देताना बोलून दाखविला होता. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व या क्षेत्रातील त्यांच्यावर प्रेम करणा-या जनतेला या दुखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना…!

◆●शोकसंवेदना●◆
शांत सुस्वभावी, संयमी राजकारणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा विधानसभा क्षेत्रासाठीच नाही तर राज्यासाठी एक अपिरीमित हानी आहे. राजकारणात अशी सरळमार्गी व साधी माणसं आता फार कमी राहीली आहे.
मी जेव्हा आमदार म्हणुन निवडू आली, तेव्हा संजयबाबुंचा मला कॉल आला व वरोरा विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणुन शुभेच्छा दिल्या. तसेच या क्षेत्राच्या लवकरच प्रथम महिला मंत्री व्हाव्या, असा आशीर्वादही दिला. ते शब्द आजही मला भावूक करतात.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो व त्यांच्या आप्तपरीवारास तथा त्यांच्यावर प्रेम करणा-या तमाम जनतेला दुखा:तून सावरण्याचे बळ मिळो, हिच प्रार्थना.

: आमदार सौ. प्रतिभा धानोरकर
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र,
वरोरा