कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या गावाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : तालुक्यातील ताडाळी गावात कोरोनाने हाहाकार माजवीला असून कोरोनामूळे येथील दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामूळे सध्या हे गाव कोरोनाचे हाॅट स्पाॅट बनले असून आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर गावाला भेट देत येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी येथील आरोग्य सेवा केंद्राला भेट देत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना केल्यात. तसेच यावेळी त्यांनी गंभिर असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याप्रसंगी सरपंच संगीता पारथी, उपसपंच निखीलेश चामरे, सदस्य अशोक मडावी, आरोग्य अधिकारी मातनकर, वैदयकीय अधिकारी निलीमा थेरे, आरोग्य मित्र संजय अडबाले, कुणाल वंजारी, विश्वास खडसे आदिंची उपस्थिती होती.
 कोरोनाच्या दुस-या लाटेने रोध्ररुप धारण करत शहरी भागासह ग्रामीण भागातही दहशत निर्माण केली आहे. त्यामूळे ग्रामीण भागातील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्या जावू नये असे  आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून आज ताडाळी येथील पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासनाला अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहे. यावेळी त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधत घाबरु नका प्रशासनाला सहकार्य करत कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास लगेच तपासणी करण्याचे आवाहण केले. प्रशासनानेही येथे विशेष उपाय योजना करत नागरिकांना सहकार्य करण्याच्या सुचना केल्या आहे. गावात स्वच्छता ठेवण्यात यावी, जनजागृती करण्यात यावी, येथील पात्र नागरिकांना कोरोना लस देण्याची गती वाढविण्यात यावी, कोरोना रुग्णालयांबाबत नागरिकांना माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी, गावात सॅनिटाईजरचा छिडकाव करण्यात यावा, यासह अनेक महत्वाच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. गावावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. मात्र सतर्कता, वेळीच उपचार आणि माक्स, सॅनिटायजर व सामुहिक अंतर या त्रिसु़त्रीचे पालण करुन यावर नक्की मात करता येईल असे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले. आ. जोरगेवार यांनी यावेळी येथील परिस्थितीची पाहणी करत उपायोजनांचाही आढावा घेतला.