नागपुर : नवीन आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्या महिन्यात ‘मे’ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 9 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे 5 दिवस बँका बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे 2021 मध्ये बँका एकूण 9 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार मे 2021 मध्ये बँक महाराष्ट्र दिन, रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बंद असणार आहेत.
देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान 15 मे पर्यंत बँका सुरू असतील. सायंकाळी चार वाजता बँका बंद ठेवल्या जातील.