सॅनिटायझर हा पिण्यासाठी नव्हे तर आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पोलिस अधीक्षक भुजबळ यांनी मृतकांच्या घरीत्रजावून सांगितले महत्व

यवतमाळ : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. त्यात असलेले अल्कोहाेल हे केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे, त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले.

सॅनिटायझर प्राशन केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शनिवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी मृतकांच्या घरी जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आढावाही घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, वणी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.भालचंद्र आवारी सोबत होते. सॅनिटायझर पिल्याने २४ तासात सहा जणांचा मृत्यू होणे, ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे एसपी म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या लोकांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन डॉ.भुजबळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.