चंद्रपूर : कोरोना काळात स्वतःची रुग्णालये कोविड – 19 करिता देत वेकोलीने आदर्श निर्माण केला आहे. लालपेठ येथे ही वेकोलीचे सर्व सोयी सुविधायुक्त रुग्णालय आहे. या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर योग्य उपचार केल्या जाऊ शकतो, ही बाब लक्षात घेत सदर रुग्णालयाला प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा करत कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रुग्णालयाची पाहणी करत येथील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य चिकित्स अधिकारी ज्योती चंद्रागड़े, डॉ. साइलेन चौधरी, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक सीतारमण, कार्यालय अधीक्षक नागेश बंडावार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मल्लारप, प्रेम गंगाधरे यांची उपस्थिती होती
कोरोनाचा प्रकोप शमविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असेल तर त्यात अद्यापतरी पूर्णतः यश आलेले नाही. त्यामुळे आता कोरोनाचा वाढता प्रकोप कमी करण्याबरोबरच कोरोना रुग्णांना उत्तम उपचार देने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परिस्थिती गंभीर असली तरी उपलब्ध संसाधनांचा योग्य उपयोग करत रुग्णांना योग्य उपचार दिल्या जाऊ शकतो. त्या दिशेने नियोजन करणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यात वेकोली प्रशासनाने पुढाकार घेत स्वताचे रुग्णालय कोरोनासाठी उपलब्ध केले आहे. यात जिल्हा प्रशासनाने त्यांना मदत करण्याची गरज असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. दरम्यान आज रविवारी त्यांनी लालपेठ येथील वेकोलीच्या रुग्णालयाची पाहणी करत येथील उपाय योजनांचा आढावा घेतला. येथे मुबलक प्रमाणात वैदयकीय सुविधा उपलब्ध आहे. 50 खाटांची सोय आहे, उत्तम स्वच्छता आहे. या सर्व बाबी कोरोना रुग्णालय सुरू करण्यासाठी पूरक आहे. केवळ ऑक्सिजन पुरवठा नसल्याने हे रुग्णालय कोरोना रूग्णांची सेवा करण्यास अपात्र ठरत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत येथे ऑक्सिजन पुरवठा देण्याची व्यवस्था करत सदर वेकोलीचे रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू करावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.