गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला : संभाजी लालसरे परिवारा कडून 7 ऑक्सिजन सिलेंडर, एक ऑक्सिजन काँसेंटेंटर सह 2 लाखाचे औषध साहित्य भेट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्णांना ऑक्सिजन ची गरज आहेत, ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, तेव्हा अशा कठीण प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित व्यवसायी संभाजी लालसरे व आयरा मनीष जैन परिवाराकडून मानवतेच्या दृष्टीने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला 7 ऑक्सिजन सिलेंडर ,एक ऑक्सिजन काँसेंटेंटर ,10 पल्स ऑक्सिमिटर ,व इतर औषध साहित्य असे एकूण 2 लाखाचे साहित्य भेट देऊन सहकार्य केले,
ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रशांत गेडाम यांनी सर्व साहित्य स्वीकारले व लालसरे परिवाराचे आभार मानले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सविताताई टेकाम,नगरसेवक अरविंद मेश्राम, पत्रकार प्रा, अशोक डोईफोडे, दीपक खेकारे, प्रा. श्रीमती आरजू आगलावे, पंकज मत्ते, मुख्याध्यापीका मंजुषा मत्ते , समाज सेवक उद्भव पुरी, ग्रामीण रुग्णालयाचे आकाश राठोड, शैलेश ठवरे,मनीषा कनाके,गोविंद गोणारे,अंजली धोंगडे,रमेश राठोड तथा इतर उपस्थित होते.

सदर साहित्य देण्यासाठी संभाजी लालसरे, नंदाताई लालसरे, आयरा मनीष जैन, सपना जैन, आरजू आगलावे, पंकज मत्ते,मंजूषा मत्ते, सतीश राजूरकर, ज्योसना राजूरकर, सुरेश राजूरकर, सुलभा राजूरकर, श्रीकांत खाडे,अनुश्री खाडे, गजानन लालसरे, यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.