रुग्णांवर नियमित उपचाराव्यतिरिक्त इतरही औषधोपचार प्रभावी : डॉ. विवेक लांजेकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : देवाचे दुसरे रूप हे डॉक्टर आहे, कोव्हिड-१९ च्या काळात देवाचे दुसरे रूप हे वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना दर्शन देत होते. काहींना आशीर्वाद रुपी उपचार देऊन आनंदाने घरी पाठवित होते तर काही आर्थिक पिळवणूक करीत होते. यात शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टीकोनातून वेगळाच मात्र राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते दवाखान्यातील देवदूतच असल्याचे रुग्णांकडून बोलल्या जात आहे.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर म्हणजे अर्धे लक्ष त्यांच्या खाजगी दवाखाण्याकडे व अर्ध्ये लक्ष नोकरीकडे असे असतात मात्र लांजेकर हे मागील वर्षांपासून उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथिल डेडीकेटेड कोव्हिड सेंटर मध्ये काम करीत आहे. त्यांनी रुग्णांना कोरोना वरील औषधोपचारा बरोबर त्याला पर्यायी इतर औषधोपचार देत होते, आदर्श डॉ. हिंमत्तराव बाविस्कर यांच्या औषधोपचार पद्धतीनुसार उपचार करीत आहे, स्वतः प्रत्येक रुग्णांजवळ जाऊन वाफारा देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, हिम्मत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

खालावलेली ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधी दिली जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयात ८९-९४ ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांनाच दाखल करता येत होते मात्र, जिल्ह्यावर रुग्णांना दाखल करण्यासाठी जागेची कमतरता असल्याने याठिकाणी ५५-६० ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना दाखल करीत आहे. २ एप्रिल पासून आतापर्यंत येथे १८५ रुग्णांना दाखल केले असून १३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर २२ रुग्ण मृत पावले आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त वयोगटातील ४५ रुग्ण बरे झाले आहे. मागील चौतीस दिवसांपूर्वी ४८-५० ऑक्सिजन पातळी असलेला रुग्णाचे ऑक्सिजन (दि. २४) आज ९५-९६ झाले असून त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र देऊन सुट्टी देण्यात आली. यावेळी चुनालाचे सरपंच बाळनाथ वडस्कर व रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोव्हिड-१९ चा दुसरा टप्पा सुरु झाला आणि यात प्रशासनाची चांगलीच झोप उडाली. कमी मनुष्यबळ व नियोजन शून्य यामुळे कोव्हिड-१९ या टप्प्याच्या परिस्थितीचे विदारक चित्र सर्वांनाच पाहायला मिळाले आहे. मात्र काही प्रमाणात येथील परिस्थिती आता आटोक्यात आली असल्याचे दिसत आहे.

रुग्णांना नियमित उपचार पद्धतीत बदल करून परिस्थितीनुसार औषधोपचार केला जात आहे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताच्या घडीला १८ रुग्ण दाखल असून ४८ ऑक्सिजन असलेल्या रुग्णाची पातळी ९६ झाली असून तो घरी परतला आहे. : डॉ. विवेक लांजेकर, वैद्यकीय अधिकारी
 मी बाहेर गाववरुन आलो असता मला ताप व श्वास घेण्यास त्रास होता यामुळे मी दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता कोरोना पॉजीटीव्ह व ऑक्सिजन पातळी ४८ होती, सरपंच बाळनाथ वडस्कर यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल झालो असता डॉक्टरांच्या उपचाराने ३४ दिवसानंतर सुखरूप घरी आलो आहे यात डॉ. लांजेकर यांनी उत्तम प्रकारे उपचार व हिम्मत दिली. : गजानन भोयपे, चुनाळा