चंद्रपूर : वरोरा वणी मार्गावर असलेल्या कुचना वसाहतीजवळ व्हॅनची दुचाकीस धडक बसली त्यात मल्लेश हनुमंत समतंगी वय 30 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला, तर नेउल संतोष ठेंगेकर वय 40 वर्ष गंभीर जखमी झाला.
ही घटना आज सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास घडली वरोरा चिमूर रस्त्याचे काम करण्यासाठी बाहेर राज्यातील कामगार कामा करीत शेगाव येथे आले असून एक युवक आपल्या ठेकेदार सोबत रोड च्या कामाकरिता लागणाऱ्या पाण्याच्या टँकर बघण्या साठी वणी कडे जात असताना मारुती व्हॅन ने जबर धडक दिली असता यात युवक व ठेकेदार गंभीर जखमी झाले असून त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
असता युवकाला डॉक्टर ने मृत घोषित केले असून ठेकेदार यास चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले , पोलीस फरार व्हॅनचा तपास करीत आहे.