चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे पुत्र अभिजीत फडणवीस यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज अभिजीत यांना नागपूर येथे हृदयाचा तीव्र झटका आला त्यात त्यांचे निधन झाले. नागपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.