स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कोरपना येथे रास्ता रोको

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महामार्ग रोखला ; वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा

चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कोरपना च्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको आंदोलन कोरपना येथील बस स्थानक परिसरात करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास चंद्रपूर – आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग व वणी राज्य महामार्ग रोखला गेला होता. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागला गेल्या होत्या.

आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले यांनी केले. या आंदोलनात स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित देण्यात यावे, कोरोना काळातील वीजबिल माफ करण्यात यावे, शेती पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, जमिनीचे पट्टे देण्यात यावे, पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना इतर वन्य प्राण्याप्रमाणे तात्काळ मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बंडू राजूरकर, रमाकांत मालेकर, रवि गोखरे, मदन सातपुते, पद्माकर मोहीतकर, भास्कर मत्ते, रत्नाकर चटप, सुभाष तुरानकर,अविनाश मुसळे, श्रीनिवास मुसळे, प्रभाकर लोडे,
अरुण काळे, गुड्डू काकडे, विकास दिवे, विपीन इंगोले, पांडुरंग वासेकर, गजानन राजूरकर, सुनील आमने, दिनेश खडसे, मोहितकर आदी सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

आंदोलकांनी ॲम्बुलन्स ला करून दिली मोकळी वाट                                                      विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे कोरपना येथे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूर जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली.

आंदोलनाला विविध संघटनेचा पाठिंबा

आंदोलनाला शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, जन सत्याग्रह संघटना आदींनी पाठिंबा दर्शवला. आणि सक्रिय सहभाग घेतला.