मनसे कामगार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी कोमल ठाकरे यांची नियुक्ती 

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या चंद्रपूर तालुका अध्यक्षपदी कोमल ठाकरे यांची नियुक्ती मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या तर्फे करण्यात आली.

याप्रसंगी सुनीता गायकवाड महिला सेना अध्यक्ष, राहुल बालमवार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.