आदिवासी समाज बांधवाना घुग्घुस येथे खावटी वाटप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : परिसरातील नकोडा, उसगाव , महातारदेवी येथील आदिवासी समाज बांधवाना खावटी योजने अंतर्गत खावटी मंजूर करण्यात आले होते मात्र सदर खावटीचे वाटप हे दुर्गापूर येथे करण्यात येणार होते. याची माहिती आदिवासी समाज बांधव गणेश कीनाके, दीपक पेंदोर यांनी राजूरेड्डी यांना दिले.

याची तात्काळ दखल घेत शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन आगदारी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार याची भेट घेऊन खावटी वाटप घुग्घुस येथेच करावे कारण घुग्घुस येथे समाज बांधवाची संख्या जास्त आहे.

पालकमंत्री साहेबांनी तात्काळ प्रकल्प अधिकारी यांना खावटी वाटप घुग्घुस येथे करावे अशी सूचना दिले असता उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा नगर परिषदेच्या जवळ करण्यात येत असून याची सर्व आदिवासी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे