किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकाला वैद्यकीय उपचारासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या कडून आर्थिक मदत

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील तुलानमेंढा येथील वासुदेव मारोती आडे (वय ५० वर्ष) हे किडनीच्या आजाराने अनेक दिवसांपासून ग्रस्त आहेत. सदर इसमाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वैद्यकीय उपचार करण्यास विलंब होत होता.

सदरची बाब तुलानमेंढा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांना कळवली. त्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत सदर इसमाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत पाठवली.

सदर आर्थिक मदत देतांना ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प.सदस्य डाँ.राजेश कांबळे, माजी सरपंच जगदीश पुराम, सुकरू कार, विनायक पाटील कावळे, बबलू मडावी, दिवाकर गेडाम, शेखर आडे यांची यावेळी उपस्थिती होती.