सार्वजनिक शौचालय झाले कचराघर 

काँग्रेस स्वच्छता अभियानात झुडपात दडलेले शौचालय मिळाले

घुग्घुस : शहर काँग्रेस कमेटीतर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली “माझं शहर माजी जवाबदारी” स्वच्छता अभियान मागील अनेक दिवसापासून राबविण्यात येत आहे.

आज कामगार नेते अमराई वॉर्डात स्वच्छता अभियान राबवित असतांना परिसरातील महिलांनी हिंदू समशान भूमी शेजारील शौचालयाची माहिती दिली सदर शौचालय हा लाखो रुपये खर्च करून निर्मिती नंतर कधी ही नागरिकांच्या वापरात आलाच नाही येथे पाण्याची व्यवस्था नाही पुरुष शौचालयाचा रस्ता हिंदू समशान भूमीची संरक्षक भिंत पडून बंद पडला तर महिला शौचालयाला जाण्यासाठी रस्ताच नाही मग या शौचालयाचे बिल पास कसे झाले.

आज या ठिकाणी झाडे झुडपे काँग्रेस तर्फे साफ करण्यात आले असून नगरपरिषदेने तातळीने सदर शौचालयाची दुरूस्ती व साफ – सफाई करून शौचालय शुरू करावे या परिसरातील नागरिकांना दिवसा – रात्री झाडा झुडपात शौचा करिता जावे लागते या झुडपात असलेल्या सर्प, विंचू व अन्य विषारी जिवा पासून कधी ही धोका होऊ शकतो करिता घुग्घुस शहरातील संपूर्ण बंद पडलेले शौचालय शुरू करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.