झाडावरून पडुन पाय फ्रँक्चर झालेल्या मुलाला उपचारासाठी पालकमंत्री वडेट्टीवार कडून आर्थिक मदत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील गुरुदेव दादाजी शेंडे (वय १२ वर्ष)हा मुलगा झाडावरून पडल्याने त्याचा पाय क्षतीग्रस्त झाला होता.

त्याच्या वर वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु वैद्यकीय उपचार करतांना आर्थिकदृष्ट्या अडचणी आल्याने सदरची माहिती जुगनाळा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांना माहिती कळवली.

त्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, बहुजण कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फतीने सदर मुलाला आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, राजेंद्र दोनाडकर, चंद्रशेखर मेश्राम, दिनकर गुरनुले, योगीराज बगमारे यांची यावेळी उपस्थिती होती.