कार्तीकचा अपघात नसुन हत्याच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ माना जमात विद्यार्थी संघटनेचा आरोप
◆ आरोपीला अटक करण्याची मागणी

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मानेमोहाळी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा तुलसी उर्फ कार्तीक भगवान जिवतोडे याला २० आगस्टला मानेमोहाडी फाट्यावर बेदम मारहान करण्यात आली.ज्यामुळे त्याचा चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णांलयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.मात्र मारेकऱ्याने अपघात झाल्याचा बनाव केला.हा अपघात नसुन हत्याच असल्याचा आरोप करीत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने चिमूर पोलिस निरीक्षकास दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

आदीवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेतर्फे दिलेल्या माहीती प्रमाणे,२० आगष्टला मामाच्या गावाला जाण्याकरीता तुलसी उर्फ कार्तिक मानेमोहाळी फाट्यावरील बस स्टापवर थांबला होता.तेव्हा आरोपीने अचाणक येऊन त्याला मारहान करायला सुरुवात केली.ज्यामुळे स्वतःला वाचविण्या करीता कार्तीक धावत सुटला.वाटेत भेटलेल्या ट्रक्टर चालकाला मला वाचवा अशी विनवनी केली त्यामुळे चालकाने कार्तीकला टॅक्टरवर घेतले.त्यानंतर आरोपीने तिथे येऊन ट्रक्टर चालकास धमकावुन कार्तीकला ट्रॅक्टर वरून उतरुन मारहान करण्यास सुरुवात केली.ट्रक्टर चालक जिवाच्या भितिने तिथुन निघुन गेला.

त्यादरम्यान गावातील दोघे गावाकडे येत असताना आरोपी एकाला मारहान करताना दिसला.त्यामुळे ते तिकडे निघाले असता आरोपी पडून गेला.या दोघांनी जखमी कार्तीकला प्राथमिक आरोग्यकेंद्र मासळ येथे दाखल केले.आरोपीने कार्तीकच्या घरी जाऊन आईला कार्तिकचा अपघात झाल्याचे सांगून आरोग्य केंद्रात आनले.मात्र तिथे ट्रक्टर चालकाने आरोपीने कार्तीकला बेदम मारल्याचे सांगीतले.तिथुन उपचाराकरीता चिमूर येथील उप जिल्हा रुग्णांलयात त्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करीता चंद्रपूरला रेफर केले.या प्रवासात आई वडील तथा गाडी चालक याला कार्तिकने आरोपीने जबर मारहन केल्याचे सांगीतले.चंद्रपूरला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. चंद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.या प्रकरणात आरोपी कडून अपघाचा बनाव केला असुन हि निर्घृण हत्या असल्याचा आरोप आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने केला असुन त्वरीत आरोपीस अटक करा असे निवेदन २४ आगस्टला चिमूर पोलिस निरीक्षक यांना दिले.निवेदन उप पोलिस निरीक्षक कांता रेजीवाड यांनी स्विकारले.यावेळेस संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्तीकचा उप जिल्हा रुग्णांलयात उपचार घेत असताना याची माहीती रुग्णांलया तर्फे कळविले नाही.त्यामुळे कार्तीकचे आई वडिल चिमूर पोलिस स्टेशनला गेले असता आम्हाला मेमो नसल्याने आम्ही तक्रार घेऊ शकत नसल्याचे सांगीतले.यामूळे या प्रकरणात दिरंगाई झाल्याने माना विद्यार्थी संघटनेतर्फे संताप व्यक्त करण्यात आला .