घुग्घुस : येथील महातारदेवी ते ताडाळी जाणाऱ्या रस्त्यावर मोठं – मोठे खड्डे पडलेले आहे.
चंद्रपूर मार्गावरील टोल नाका वाचविण्यासाठी याच मार्गाचा वापर होत असल्याने या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीकरणा साठी युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस शिवानी ताई वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद घुग्घुसचे मुख्याधिकारी आर्शिया जुही, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी एस.वी.कुंभे साहेबांना निवेदणातून मागणी केली.
युवक काँग्रेस शिष्टमंडळात सूरज कन्नूर जिल्हा उपाध्यक्ष, तौफिक शेख शहर अध्यक्ष, सचिन कांबळे, अमित सावरकर, श्रीकांत सुंदरगिरी, सुनील कनकम, अक्षय आढे, शुभम गावंडे, आदी उपस्थित होते.